Ad will apear here
Next
आरोग्य योजनांचा रुग्णांनी लाभ घ्यावा : अशोक नेते
‘जिल्हयातील दोन लाख रुग्णांना आयुष्मान योजनेचा लाभ’
गडचिरोली : ‘तळागाळातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी सरकारतर्फे ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’, ‘आयुष्मान भारत योजना’ व ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ राबवण्यात येत आहेत. जिल्हयातील दोन लाख रुग्णांना या योजनेचा लाभ होईल, तसेच असंघटित कामगारांसाठी पेंशन योजनेंतर्गत ६० वर्षानंतर कामगारांना तीन हजार रुपये निश्चित पेंशन मिळणार आहे’, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. 

गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्ही. एल. ई. प्रतिनिधींच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ‘देशातील प्रत्येक नागरिक सुखी, संपन्न व्हावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. ‘पंतप्रधान जनधन योजना’, ‘मुद्रा बँक’, ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’, ‘अटल पेंशन योजना’ अशा विविध योजना शासन राबवत आहे’, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

खासदार अशोक नेते पुढे म्हणाले, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती असल्यामुळे ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’त समाविष्ट असलेल्या १३५० आजारांवर आता पाच लाख रुपयांपर्यंतचे औषधोपचार सरकारतर्फे करण्यात येणार आहेत. कुटुंबातील चार जणांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्यामुळे प्रत्येकाने गोल्डन कार्ड तयार करून घ्यावेत, योजनेत सहभागी होण्यासाठी आजच आपल्या जवळील सी. एस. सी. सेंटरवर जाऊन मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, बँक पास बुकसह प्रतिनिधींना भेटून नाममात्र शुल्क भरून कार्ड तयार करून घेता येतील, ते करून घ्यावेत’, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना म्हणाल्या, ‘‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ १८ ते ४० वयोगटापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे. अंशदान म्हणून प्रत्येक महिन्याला एक न्युनतम राशी भरावी लागणार आहे. असंघटित कामगारांसाठी ‘पेंशन योजनां’तर्गत ६० वर्षे वय झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत.  लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येईल. लाभार्थीला स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडायचे झाल्यास, जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत  मिळेल. असंघटित कामगारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची व उतारवयात उपयोगाची योजना आहे.’  

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, भविष्य निर्वाह निधीचे सतीश मेश्राम, निरज सिन्हा, शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रुडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नासीर हाशमी यांनी केले, तर आभार निलेश कुंभारे यांनी मानले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZYTBY
Similar Posts
गडचिरोली जिल्ह्यात मोफत मदत केंद्राचे उद्घाटन गडचिरोली : जिल्ह्यात समतादूतामार्फत ‘राइट टू एज्युकेशन’ (आरटीई) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन पाच मार्च २०१९ रोजी गोकुळनगर येथील अंगणवाडीत करण्यात आले.
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले
गडचिरोली ते गुगल... स्वप्नीलची भरारी मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील स्वप्नील बांगरे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, गुगल-युडॅसिटी शिष्यवृत्ती मिळवली आहे. युडॅसिटी नॅनोडिग्रीचा विद्यार्थी असलेल्या स्वप्नीलने आपले स्वप्न खरे करून दाखवले आहे. स्वप्नीलची युडॅसिटीमध्ये निःशुल्क अँड्रॉइड बेसिक्स अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, तो अँग्युलर जेएस अॅप्लिकेशनवर काम करत आहे
वैराटगडावर स्वच्छता मोहीम गडचिरोली : सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील किल्ले वैराटगडावर दुर्गसंवर्धनदिन साजरा करण्यात आला. गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language